अक्षरा विद्यालयच का ?

मुलांच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे सर्वात गुंतागुंतीचे अनुभव म्हणून सर्वत्र स्विकारली जातात. या सुरुवातीच्या वर्षांत, मुले बॉल फेकण्यापासून त्यांच्या बुटाच्या फीत बांधण्यापर्यंत अनेक कौशल्ये अनुकरणाने शिकतात. जी कौशल्ये त्यांना समाजात कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. आयुष्यातील पहिल्या आठ वर्षात मुले, आपण पुढे एक व्यक्ती म्हणून कोण असू हे देखील ठरवतात. याच वर्षामधे मुलांचे अनुभव वाढविण्यासाठी नातेसंबंधाच्या मदतीने अनेकांशी ओळख होण्यास मेंदू मदत करतो आणि मुलांना भविष्यातील यशस्वी वाटचालीकडे मार्गक्रमण करण्यास मदत करतो. माणसाच्या आयुष्यातील पहिल्या आठ वर्षांत झालेले आकलन हे इतर कोणत्याही कालावधीपेक्षा अधिक असते. अनुभव आणि नातेसंबंध हे मुलाच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाचे असतात आणि पहिल्या आठ वर्षांत खेळातून बरेच काही शिकता येते. पहिली आठ वर्षे सुरळीत गेली पाहिजेत म्हणून अक्षरा विद्यालयामध्ये आम्ही ‘मेंदूवर आधारित शिक्षण’ ही विशेष विकसित पद्धती वापरुन मुलांना शिकू देणार आहोत.

पहिल्या आठ वर्षात मुलांना शिकण्यात अडचणी आल्या तर पुढील शिक्षणात अडथळे निर्माण होतात; म्हणूनच आम्ही मुलाच्या संकल्पना स्पष्ट होण्यावर भर देणार आहोत. यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साधन-साहित्याचा वापर करणार आहोत.

शिक्षकांसोबत सुरक्षित नातेसंबंध विकसित करण्यासाठी तसेच मुलांना सक्षम बनवण्यासाठी भावनिक आधार तसेच चांगले वातावरण देणे आवश्यक आहे. मुलांनी मोकळेपणाने बोलणे, व्यक्त होणे आणि शिकणे आवश्यक आहे. निश्चितपणे आम्हीही मुलांना अशाच प्रकारे शिकविणार आहोत.

“मी जे ऐकतो ते विसरतो, मी जे पाहतो ते मला आठवते आणि मी जे करतो ते मला समजते.”
जेव्हा शिकण्याचा विचार येतो, तेव्हा ऐकणे हे पाहण्याइतके चांगले नसते, पाहणे हे अनुभवाइतके चांगले नसते आणि खरे शिकणे तेव्हाच दिसून येते जेव्हा अनुभवातून कृती निर्माण होते. अक्षरा विद्यालयात एक विशेष अभ्यासक्रम असेल जो अशा अनुभवांवर आधारित शिकण्यास मदत करेल.

बसण्याची व्यवस्था, वेळापत्रक, वार्षिक नियोजन हे सर्व मेंदु आधारित अभ्यासाच्या शिफारशीनुसार असेल.

लहान वयात मुले अनेक भाषा झपाट्याने शिकतात. त्यामुळे इंग्रेजी भाषेची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मुले स्वत:च्या मराठी भाषेत शिकतील पण त्यांचे इंग्रेजी भाषेचे कौशल्यही चांगले असेल.