राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि बालशिक्षण

by | फेब्रुवारी 26, 2022 | शिक्षण | 0 comments

शिक्षण ही सातत्याने विकसित होणारी प्रणाली आहे. शाश्वत विकास कृती कार्यक्रमामधील उद्दिष्ट क्र. ४  – ‘जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम’ याची २०३० पर्यत उद्दिष्टपूर्ती करण्याच्या हेतूने ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ चा आराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परंपरा व मूल्ये, सृजनक्षमतेचा विकास, आकलन क्षमता, साक्षरता व संख्याज्ञान, तार्किक व समस्या निराकरण क्षमता, सामाजिक, नैतिक आणि भावनिक क्षमतांचा विकास अशा मूलभूत क्षमता विकासावर भर देते.

ऱषान मुऱाच्या मेंदूच्या एकंदर वळकाशाऩैकी 85% षून अधधक वळकाश ळयाच्या शषाव्या ळवायऩयंत षोतो. लहान मुलाच्या मेंदूच्या एकंदर विकासापैकी 85% हून अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो. गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था पूर्व विकास, संगोपन आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिक तरतुदीमुळे ही मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यास सक्षम बनतील. बालशिक्षणासाठी लवचिक, बहुपैलू, बहुस्तरीय, खेळांवर आधारित, कृती आधारित आणि जिज्ञासा आधारित शिक्षणाचा समावेश असावा. ज्यामध्ये अक्षरे, भाषा, संख्या मोजणे, रंग, आकार, घरातील आणि मैदानी खेळ, कोडी आणि तार्किक विचार, समस्या सोडवणे, चित्रकला, रंगवणे आणि इतर दृश्य कला, हस्तकला, नाटक आणि बोलक्या बाहुल्या, संगीत आणि हालचाली यांचा समावेश असावा. यात सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य आणि सहकार्य यांचा विकास करण्यावरदेखील लक्ष केंद्रित केले जावे.

वय वर्ष ५ च्या अगोदर प्रत्येक मुलाने “पूर्व अध्ययन वर्ग (प्रिपरेटरी वर्ग) किंवा “बालवाडी” मध्ये अपेक्षित असलेली मूलभूत कौशल्ये आत्मसात केलेली असावीत. पूर्वाध्ययन वर्गातील शिकणे हे प्रामुख्याने खेळांवर आधारित असेल. जे आकलनात्मक, भावनात्मक, सायकोमोटर क्षमता, पूर्व साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे यावर आधारित असावे. वाचन, लेखन आणि संख्यांच्या मूलभूत क्रिया करता येणे ही भविष्यातील सर्व शालेय शिक्षणासाठी आणि निरंतर अध्ययनासाठी एक अनिवार्य पूर्वअट आहे. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, वाचन, लेखन, बोलणे, मोजणे, अंकगणित, गणितीय विचार यावर पूर्व अध्ययन वर्गात भर असावा.

मनोरंजक आणि प्रेरणादायक पुस्तके, उपक्रमासाठी राखीव तास, वर्षभर नियमित कार्यक्रम, अनुभवात्मक, सर्वसमावेशक, एकात्मिक, लवचिक, जिज्ञासू, संशोधन केंद्रित, सहाध्यायीकडून समोरासमोर बसून शिकणे अशा ऐच्छिक आणि मजेदार अशा उपक्रमांचा समावेश केला जावा. सर्व स्तरांवर, अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब केला जावा. ज्यात प्रत्येक विषयामध्ये प्रात्यक्षिक शिक्षण, कला आणि खेळ यांचा समावेश असावा. शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असावे.

प्रत्येक स्तरावर अध्यापनात व शिक्षण प्रक्रियेत भारतीय कला आणि संस्कृती एकत्रित करुन भारतीय संस्कार बिंबवण्यासाठी कलासक्त शिक्षण वर्गातील व्यवहारामध्ये समाविष्ट केले जावे.  स्थानिक खेळासह शारीरिक उपक्रमांचा वापर अध्यापन पद्धतीमध्ये करुन सहकार्य, स्वयं-पुढाकार, स्वत:ची दिशा, स्वयंशिस्त, सांघिक कार्य, जबाबदारी, नागरिकत्व इ. कौशल्ये साध्य करण्यासाठी क्रीडा-एकात्मिक शिक्षण वर्गातील व्यवहारामध्ये समाविष्ट केले जावे.  

किमान चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, स्थानिक/प्रादेशिक भाषा असले पाहिजे. एखादी भाषा शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी ती शिक्षणाचे माध्यम असणे आवश्यक नाही. २ ते ८ वर्षे या वयात मुले भाषा अतिशय लवकर शिकतात. त्यामुळे पायाभूत पायरीपासूनच मुलांना सुरुवातीलाच विविध भाषांची ओळख करून दिली जावी पण मातृभाषेवर विशिष्ट भर असावा.

0 Comments

Submit a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत