अक्षरा विद्यालय बद्दल

अक्षरा विद्यालय ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शाळा असून नवीन शैक्षणिक धोरण (NEP २०२०) नुसार स्थापन झालेली खाजगी विनाअनुदानित शाळा आहे. अक्षरा विद्यालय हे बालपणीच्या सुरवातीच्या काळात मजेदार कृतियुक्त शिक्षणास प्रोत्साहन देते. 

शिक्षण ही शिक्षक करत असेलेली गोष्ट नाही, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी माणसामध्ये उत्स्फूर्तपणे विकसित होते. मुलांमध्ये शिकण्याची उपजत नैसर्गिक क्षमता असते. त्यांना जगाबद्दल उत्सुकता असते. शिकण्यासाठी आणि नवीन गोष्टींच्या शोधासाठी ते आतूर असतात. 

मुलांचे शिकण्याचे अनुभव आनंददायक, सहयोगी आणि रचनात्मक बनविण्यासाठी, विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक उपक्रम राबविण्याचे अक्षरा विद्यालयाचे उद्दिष्ट आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्वानुभव, नवोपक्रम आणि परिपूर्ण अनुभव देण्यासाठी चांगले वातावरण तयार केलेले आहे. 

आनंददायी शिक्षण

आनंद ही एक आंतरिक समाधानकारक भावना आहे. जेव्हा मूले आनंदाने शिकतात तेव्हा त्याची शिकण्याची क्षमता लक्षणीय वाढते. 

सहयोगी शिक्षण

शिक्षणप्रक्रियेतील मुख्य घटक असलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा एकत्रित सहभाग चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक समर्थन प्रणाली विकसित करण्यात मदत होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

रचनात्मक शिक्षण

मुख्य प्रवाहातील शाळा अनुभवाऐवजी पाठ्यपुस्तकांद्वारे शिक्षण देण्यावर विश्वास ठेवतात. रचनावादानुसार ‘इंद्रीये’ हा शिकण्याचा मुख्य मार्ग आहे; ज्यामुळे मेंदू आसपासच्या जगाचे संपूर्ण आकलन होण्यासाठी समज तयार करतो.