अक्षरा विद्यालय
अक्षरा विद्यालय ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शाळा असून नवीन शैक्षणिक धोरण (NEP २०२०) नुसार स्थापन झालेली खाजगी विनाअनुदानित शाळा आहे. अक्षरा विद्यालय हे बालपणीच्या सुरवातीच्या काळात मजेदार कृतियुक्त शिक्षणास प्रोत्साहन देते.
अक्षरा विद्यालय का?
अनुभव आणि नाते सबंध या दोन्ही वरून मुलाची प्रगती कशी होते हे समजते. पहिल्या आठ वर्षात मुले खेळामधून खुप काही शिकत असतात.
आम्ही मुलांची संकल्पना स्पष्ट होण्यावर भर देणार आहोत. त्यामुळे पुढील शिक्षणामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत
शिक्षकासोबत चांगले नातेसबंध विकसित करण्यासाठी तसेच सक्षम बनविण्यासाठी भावनिक आधार तसेच त्यासाठी चांगले वातावरण असणे आवश्यक आहे.
ऐकणे हे पाहण्या इतके चांगले नाही. पाहणे हे अनुभवा इतके चांगले नाही आणि चांगल्या शिक्षणातून हेच स्पष्ट होते की अनुभवातून एखादी क्रिया होणे.
बैठक व्यवस्था, शैक्षणिक वेळापत्रक व वार्षिक नियोजन हे मेंदू आधारित संशोधनाच्या शिफारशी प्रमाणे असेल.
मुले ही त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेतून(मराठी) शिकतील परंतु त्यांचे इंग्रजी भाषेचे कौशल्य देखील चांगले असेल.
आमच्याकडे या
आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी ८६६९६२५६०२ या मोबाईलवर संपर्क साधा किंवा खाळती क्लिक करा